मुंबई- काही ठिकाणी लोकांचा पोलिसांशी काही वादविवाद झाले. वैद्यकीय व पोलीस क्षेत्रातील सर्व घटक धोका पत्करून आपल्यासाठी काम करत आहेत. याची जाणीव ठेवून त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे, असे राज्यसभा खासदार शरद पवार म्हणाले.
'वैद्यकीय व पोलीस क्षेत्रातील घटकांचे अभिनंदन गरजेचे' - शरद पवार
सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी धोका पत्करुन रुग्णांची देखरेख करत आहेत. तसेच पोलीसही आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता बंदोबस्तासाठी उभे आहेत. यामुळे त्यांना सहकार्य करुन त्यांचे अभिनंदन करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
!['वैद्यकीय व पोलीस क्षेत्रातील घटकांचे अभिनंदन गरजेचे' शरद पवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6630173-thumbnail-3x2-sur.jpg)
शरद पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. पवार पुढे म्हणाले, काही ठिकाणी खासगी दवाखान्यांमधील ओपीडी बंद करण्यात आल्या आहेत. आपण धोक्याचे काम करत आहात. पण, ही सेवा सुरू ठेवून लोकांना मदत करण्याचे काम सुरू ठेवले पाहिजे, असे आवाहनही पवार यांनी केले.
हेही वाचा -सायन कोळीवाड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; चाळ बंद