महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे आणि राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करणार - मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Reaction : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप ही तपासली जात आहे. कायदेतज्ञ त्याबाबत लवकरच आपला अहवाल देतील आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसंच दत्ता दळवी यांच्यावर झालेली कारवाई योग्य असून यापूर्वीही अशी कारवाई महाविकास आघाडीच्या काळात राणे यांच्यावर झाली होती, याचा दाखला देसाई यांनी दिला.

Shambhuraj Desai
मंत्री शंभूराज देसाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 7:45 PM IST

प्रतिक्रिया देताना मंत्री शंभूराज देसाई

मुंबई Shambhuraj Desai Reaction: माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले की, एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी संबंधित पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी करतात. जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मत असं तयार झालं, या गुन्ह्यामध्ये सत्य आहे तर मग त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना पोलीस नियमाप्रमाणे अटक करतात. दळवींचं वक्तव्य सुद्धा ऐकलं, पाहिलं त्यांचं वक्तव्य 100 टक्के आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वक्तव्य कोणी करत असेल तर कारवाई होणारच. त्यामुळे कायदा कायद्याचे काम करेल, पोलीस पोलिसांचे काम करतील. पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं, असंही देसाई यांनी सांगितलं.


ठाकरे-राऊत यांच्या वक्तव्याची तपासणी सुरू: राज्य सरकार हे कायद्याने चालणारे आहे. संजय राऊत यांनाही कायदा माहीत आहे. त्यांनी फक्त थोडंसं अडीच तीन वर्षे पाठीमागे जाऊन बघावं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या बद्दल जेव्हा वक्तव्य केलं, त्या सरकारच्या काळामध्ये कायद्याचा कसा वापर झाला आणि कशा पद्धतीने काय झालं. पोलीस हे पोलिसांच्या पद्धतीने आणि कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करत असतो, त्याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. उद्धव ठाकरे यांच्या क्लिपची तपासणी सुरू आहे. व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप दोन्ही माझ्याकडे आलेली आहे. एवढ्यावरच संजय राऊत थांबलेले नाहीत ही क्लिप माझ्याकडे आल्यानंतर, आज परत एकदा तोच शब्दप्रयोग संजय राऊत यांनी केलेला आहे. एवढं करून ते थांबले नाहीत तर त्यांनी जो शब्द प्रयोग केलाय तो असंसदीय आहे.


पीकपाण्याचा आढावा घेणार: आम्ही कॅबिनेटमध्ये राज्यातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेत असतो. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यातल्या पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री नुकसांनीबाबतचा निर्णय घेतील. तसंच विधानसभाअध्यक्षांच्या चौकशीला सामोरे जाणार, आम्ही कोणतीही कृती नियमबाह्य केलेली नाही किंवा घटनाबाह्य केलेली नाही. विधानसभेचे जे नियम आहेत कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत. त्या सर्वांचे शंभर टक्के पालन करूनच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आमची चौकशी होऊ दे, ज्या काही बाबी विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत होणार आहेत त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत, असंही शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. सत्तेतील लोकांनीही वादग्रस्त वक्तव्य केलीत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही?, संजय राऊतांचा सवाल
  2. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं - बाळासाहेब थोरात
  3. विरोधकांवर मुद्दाम गुन्हे दाखल, शेतकऱ्यांसाठी राज्यभर निषेध मोर्चे काढणार - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details