महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2019, 8:43 AM IST

ETV Bharat / state

स्मृती इराणी 'मेमरी लॉस' झालेली खासदार - शालिनी ठाकरे

मालिकांमधील मेमरी लॉसच्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी १२ वी पास तर कधी पदवीधर आहोत असे लिहीत आहेत.

शालिनी ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भांडुपमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालिनी ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना भाजप नेत्या स्मृती इराणी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली.

शालिनी ठाकरे सभेत बोलताना

आमच्या सभा आणि सभेच्या गर्दी पाहून काही लोकांच्या पोटात कावळे ओरडत आहेत. राज ठाकरे मोदी, शाह जोडगोळीला सतेतून बाहेर बसवल्या शिवाय स्वस्थ बसू शकत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, मालिकांमधील मेमरी लॉसच्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी १२ वी पास तर कधी पदवीधर आहोत असे लिहीत आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी आता काम करणार नाही.

प्रज्ञा सिंहवर टीका करताना त्या म्हणाल्या, प्रज्ञा सिंह भाजपच्या उमेदवार आहेत. मुंबई दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झालेले करकरे यांना माझा श्राप लागला, असे बेताल वक्तव्य त्या करत आहेत. माझे तर असे म्हणणे आहे की, प्रज्ञा सिंहने सरळ देशाच्या सीमेवर जाऊन दहशतवादी लोकांना श्राप देऊन देशावरील दहशतवादी हल्ले थांबवावे. यावेळी ठाकरे यांनी महिला समस्या आणि त्यावर अपेक्षित उपाय योजनांवर मोदी सरकारवर टीका केली. या सभेसाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details