मुंबई- राहुल गांधी उत्तरप्रदेशातील अमेठी या पारंपरिक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, या मतदारसंघात त्यांचा जनाधार आता पहिल्यासारखा राहिला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाची भीती असल्यानेच ते आता केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन केले आहे. गुरुवारी ते भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
राहुल गांधींना पराभवाची भीती असल्यानेच वायनाडमधून उमेदवारी - शाहनवाज हुसैन - राहुल गांधी
मोठे राजकीय नेते २ मतदार संघात निवडणूक लढवतात. मात्र, त्यामागे काही भूमिका असते. मात्र, राहुल गांधी यांना पराभवाची भिती वाटत असल्याने ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे हुसैन म्हणाले.
भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही पंतप्रधान मोदीच चालणार आहेत. या निवडणुकीत ७४ जागा भाजप जिंकेल, असा विश्वास हुसैन यांनी व्यक्त केला आहे. मोठे राजकीय नेते २ मतदार संघात निवडणूक लढवतात. मात्र, त्यामागे काही भूमिका असते. मात्र, राहुल गांधी यांना पराभवाची भिती वाटत असल्याने ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले.
शाहनवाज हुसैन मुंबई आणि मुंबई लगतच्या भिवंडी मतदार संघात प्रचार करणार आहेत. मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, शिवाजीनगर या मुस्लिम बहुल वस्तीत हुसैन यांच्या सभा होणार आहेत.