मुंबई:'सीबीआय'च्या 'एफआयआर'मध्ये शाहरुख खान याने समीर वानखेडेंना लाच दिल्या प्रकरणी शाहरुख खानवर वकील निलेश ओझा यांनी आरोप करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये तातडीची याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये त्यांनी मुद्दा अधोरेखित केलेला आहे की, सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर 'एफआयआर' नोंदवलेला आहे आणि त्यामध्ये शाहरुख खान यांच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे. परंतु भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार लाच देणारा तसेच लाच घेणारा दोन्ही गुन्हेगार असतात. त्यामुळेच लाच देणारा व्यक्ती शाहरुख खान असेल तर त्यांना देखील या प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात यावे आणि तसा खटला चालवावा, अशी मागणी करणारी ही याचिका वकील निलेश ओझा यांनी मागील आठवड्यात दाखल केली होती. याची आज सुनावणी होणार होती. परंतु मुख्य न्यायाधीशांनी ती सूचीबद्ध केलीच नाही. त्यामुळे त्याची सुनावणी झालेली नाही.
Petition Against Shahrukh Khan: शाहरुख खानला देखील समीर वानखेडे प्रकरणात आरोपी करावे; याचिकेची सुनावणी टळली - समीर वानखेडे
कार्डेलिया क्रूजवर ड्रग पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आणि तसा 'एफआयआर' समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयच्या वतीने दाखल आहे. परंतु, आता या प्रकरणात शाहरुख खान याने लाच दिली असा 'सीबीआय'चा दावा आहे; तर मग लाच देणाऱ्याला देखील आरोपी करावे आणि खटला चालवावा अशी मागणी या याचिकेत केलेली आहे.
![Petition Against Shahrukh Khan: शाहरुख खानला देखील समीर वानखेडे प्रकरणात आरोपी करावे; याचिकेची सुनावणी टळली Petition Against Shahrukh Khan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-06-2023/1200-675-18820690-thumbnail-16x9-khan.jpg)
पुढील आठवड्यात सुनावणी :कार्डेलिया क्रूजवर ड्रग पार्टी प्रकरणानंतर 'एनसीबी'चे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. तसेच शाहरुख खान याच्या मुलाला त्या खटल्यातून सोडवण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतली, असे आरोप आहेत. या प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 'सीबीआय' त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. तसेच त्याबाबतचा स्वतंत्र खटला मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठासमोर सुरू आहे. परंतु केवळ सॅम डिसूजा किंवा कपिल तसेच 'एनसीबी'चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्यासोबत आता लाच देणारा शाहरुख खान आहे. तर मग शाहरुख खान याला देखील आरोपी करण्यात यावे आणि खटल्यामध्ये त्याला देखील ओढण्यात यावे, अशा स्वरूपाची ही याचिका आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. पुढील आठवड्यात लवकर याच्यावर सुनावणी होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: