ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shab-E-Barat : मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात - सुख, समृद्धीसाठी प्रार्थना

मुंबईच्या मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान (Bada Qabrastan in Marine Lines.) येथे शब-ए-बारात ( Shab-E-Barat) पाळली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली शब ए बारात शनीवारी सायंकाळपर्यंत पर्यंत चालणार आहे. इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे (Islamic calendar) आठवा महिना म्हणजे शाबान. या महिन्यातील चौदा आणि पंधरावी रात्र शब-ए-बारात म्हणून साजरी केली जाते. या रात्री मुस्लीम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यात सुख, शांती, यश, समृद्धीसाठी प्रार्थना (Pray for happiness, prosperity) करतात.

Shab-E-Barat
शब-ए-बारात
author img

By

Published : Mar 19, 2022, 7:22 AM IST

मुंबई: मुंबईच्या मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात पाळली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला हा उत्सव शनीवारी सायंकाळपर्यंत पर्यंत चालणार आहे. इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे आठवा महिना म्हणजे शाबान. या महिन्यातील चौदा आणि पंधराव्या दिवसाची रात्र शब-ए-बारात म्हणून साजरी केली जाते.अल्लाहची माफी मागण्याचा आणि आपल्या पूर्वजांसाठी वा पितरांसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस असतो. शब-ए-बारातची रात्र ही चंद्रदर्शनावर अवलंबून असते. या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यातील सुख, शांती, यश, समृद्धी यांसाठी प्रार्थना करतात. शिय्या आणि सुन्नी अशा दोन्ही पंथातील बांधव ही 'शब-ए-बारात' ची रात्र साजरी करतात. सलमान कुरेशी म्हणतात, "हा सण मृतांची ईद असा मानला जातो आणि आम्ही तो दरवर्षी साजरा करतो."

ABOUT THE AUTHOR

...view details