मुंबई- येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडकेबाज कारवाई सुरू आहे. या पथकाने 2 आठवड्यात चार सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जुहू, कुलाबा, प्रभादेवी आणि आता अंधेरी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महीलेला अटक करण्यात आली आहे.
दोन आठवड्यात 4 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 17 मुलींची सुखरूप सुटका - रॅकेटचा पर्दाफाश बातमी
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मरोळमधल्या हॉटेल सहारमध्ये धाड टाकण्यात आली. यात 17 मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा-दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिग बींच्या मनात आली 'ही' शंका
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मरोळमधल्या हॉटेल सहारमध्ये धाड टाकण्यात आली. यात 17 मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यातील रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रभा परबीर मंदी (वय 36), असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून विलेपार्लेमधून तिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.