पुणे :माणसाला आयुष्यात कशाची ना कशाची भीती असते. यासाठी माणूस काहीही करतो. एखाद्या गोष्टीची भीती मनात बसली की माणूस त्यापासून लवकर दूर जात नाही. त्यासा त्यातुन बाहेर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माणसाने आयुष्यात भयमुक्त व्हावे असे सांगत पुण्यातील निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली ( Retired Colonel Girija Shankar Mungali ) यांनी सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या 1600 फूट उंचीवरून 70 व्या वर्षी पॅराजम्पिंग ( parajumping ) करून एक नवीन आदर्श केला आहे.
पॅराशूट ब्रिगेड महोत्सवच्या रीयुनियन : निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली यांनी पॅराशूट ब्रिगेड महोत्सवच्या रीयुनियन 2022 या उपक्रमात आग्रा येथे हे पॅराजम्पिंग केले. यावेळी त्यांच्या बरोबर 35 जण सहभागी झाले होते. यात गिरिजा शंकर मुंगली हे सर्वाधिक म्हणजेच 70 वर्षाचे होते. त्यांनी 1600 फूट उंचीवरून पॅराजम्पिंग केले. पॅराजम्पिंग मध्ये उंच उडी नव्हे तर सर्वात कमी उंची वरून पॅराजम्पिंग करणे अवघड समजले जाते. यात वेळ आणि परशुट हे योग्य वेळी उघडले जाणे महत्त्वाचे असते. हे धाडस निवृत्त कर्नल मुंगली यांनी अवघ्या सत्तराव्या वयात करून दाखवले.