महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsamvad Yatra : आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू - अंबादास दानवे

आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा उद्यापापासून सरु होत आहे. आदित्य ठाकरेंची उद्यापासून शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, बीड, संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित असणार आहेत.

Shivsamvad Yatra
Shivsamvad Yatra

By

Published : Feb 5, 2023, 6:06 PM IST

मुंबई : पदवीधर निवडणुकीतील घडामोडी, ठाकरे गटातील नेते शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे प्रथमच नाशिकसह चार जिल्ह्याच्या दौरा जाणार आहेत. चार दिवशी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत. शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित असणार आहेत.


शिवसंवाद यात्रा सुरू :शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक पदाधिकारी शिंदे गटासोबत गेले. आदित्य ठाकरे यांनी यानंतर पक्षातील गळती रोखण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. या यात्रेचा सातवा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. यावेळी ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी आदित्य ठाकरे उद्यापासून नाशिक, बीड, जालना, संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या चार दिवशी दौरात शिंदे गटातील आमदार खासदारांचा समाचार घेणार आहेत.



आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर :शिवसेना खासदार संजय राऊत अगोदर नाशिक दौऱ्यावर आले होते. भाजप, शिंदे गटाचा समाचार घेताना खासदार हेमंत गोडसेंवरही जोरदार टीकास्त्र सोडले होते. गोडसे यांनी देखील राऊतांना प्रतिउत्तर दिले होते. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शिवसंवाद यात्रा टप्पा सातवा :दिवस पहिला - ०६ फेब्रुवारी २०२३, इगतपुरी, मुंढेगाव (संवाद)
वेळ - दुपारी १२.४५ , नाशिक सिन्नर येथे वडगाव पिंगळा (संवाद), दुपारी २.३०, सिन्नर, नाशिक (संवाद) , सायंकाळी ३.४५, पळसे, जिल्हा नाशिक (संवाद), सायंकाळी ४.४५, नाशिक (मेळावा) सायंकाळी ५.४५


मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी, चांदोरी (निफाड) (संवाद) वेळ - सकाळी ११.१५, विंचूर (निसर्ग लॉज), नाशिक (संवाद) वेळ - दुपारी ०१.००, ठिकाण - नांदगाव, नाशिक (संवाद), वेळ - दुपारी ०३.००, ठिकाण - महालगाव (वैजापूर), संभाजीनगर (संवाद) वेळ - सायंकाळी ५.३५,


८ फेब्रुवारी रोजी


ठिकाण - सोमठाणा, बदनापूर, जि. जालना (संवाद), वेळ - सकाळी ११.३० वाजता, रामनगर, जालना (संवाद), वेळ - दुपारी १.१५
घनसावंगी, जि. जालना (संवाद), वेळ - दुपारी ०३.००, गेवराई, जि. बीड (संवाद), वेळ - सायंकाळी ४.३५,

०९ फेब्रुवारी रोजी :


ठिकाण - बिडकीन (पैठण), जि.संभाजीनगर (संवाद), वेळ - सकाळी ११.३०, ठिकाण - पाटोदा (संभाजीनगर प.) (संवाद)

वेळ - दुपारी १२.४०, ठिकाण - नंद्राबाद (रत्नपुर) (संवाद)

हेही वाचा -Maharashtra Politics: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 10 फेब्रुवारीला बैठक; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर होणार चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details