मुंबई : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा सरकारने केली. त्यानंतर उमेश कोल्हे हत्या प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या चौकशीची मागणी झाली. दोन्ही प्रकरण ठाकरे पिता-पुत्राची कोंडी करण्यासाठी असल्याचे म्हटल जात असतानाच आता उद्धव ठाकरे (Opposition and ruling party face to face ) एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी फ्रंटफूटवर आलेत. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहे. शिंदे सरकारला लक्ष्य करण्यासाठी विषयही ठरला असून, ठाकरे विरुद्ध शिंदे घमासान बघायला मिळू शकते. ( Seventh day of winter session )
महाविकास आघाडीने आखली रणनीती :हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात नागपूरला गेले, मात्र अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नाही. मात्र, रविवारी रात्री अचानक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत नागपूरमध्ये दाखल झाले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदेंना एनआयटी भुखंड प्रकरणावरून घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली होती, पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दाच उपस्थित केला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दाही विरोधकांकडून फारसा प्रभावीपणे मांडला गेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याचंही बोलले गेले. त्यानंतर आता उद्धव ठाकरेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारला घेरण्यासाठी समोर आलेत.
उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यावरून शिंदेंना घेरणार ?आमदार सचिन अहिर यांनी नागपूरातील भेटीबद्दल सांगितले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर उद्धव ठाकरे हे 97 अंतर्गत विधान परिषदेत बोलणार आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही ( Opposition leader Ambadas Danve ) या मुद्द्यावर बोलणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावण्याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिंदे सरकारला लक्ष्य करणार (Shinde govt target over borderism ) आहे.
विधानसभेत संख्याबळ कमी : विधान परिषदेतील कामजातही महाराष्ट्र कर्नाटक सीमवादावरील चर्चेचा समावेश करण्यात आला असून, या चर्चेत अंबादास दानवे, उद्धव ठाकरे, अनिल परब, सुनील शिंदे हे सहभागी होणार आहेत. दरम्यान, विधानसभेत संख्याबळ कमी झालेल्या ठाकरेंनी आता संख्याबळ जास्त असलेल्या विधान परिषदेत शिंदे सरकारला घेरण्याची रणनीती केली आहे.
संजय राऊत कोणता बॉम्ब फोडणार ?अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनआयटी भुखंड प्रकरणामुळे विरोधकांच्या रडारवर आले होते. मात्र, सरकारने निर्णय मागे घेत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी बॉम्ब फोडणार असल्याचे विधान केले. त्यामुळे नागपुरात संजय राऊत कोणता बॉम्ब फोडणार आणि त्यांच्या रडारवर कोण आहेत, हे आज समोर येऊ शकते.