महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सोमवारी १७ हजार ६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद - राजेश टोपे न्यूज

मागील काही दिवसांच्या तुलनेत आज राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे. आज १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ रुग्णांवर उपचार सुर आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० हजारांच्या जवळ पोहोचली आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Sep 14, 2020, 10:23 PM IST

मुंबई- राज्यात आज कोरोना १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण बरे झाले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार ५६६ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात ३६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २९ हजार ८९४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के आहे.

हेही वाचा-मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details