महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ATS Arrested Bangladeshi Nationals : एटीएस पथकाकडून सात बांगलादेशी नागरिकांना अटक; बलात्काराच्या वॉन्टेड आरोपीचाही समावेश - बलात्काराच्या वॉन्टेड आरोपीचाही समावेश

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटने मुंबईसह नवी मुंबई परिसरात कारवाई करत काल (मंगळवारी) सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या सात बांगलादेशींमध्ये दोन बलात्काराच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी आहेत.

ATS Arrested Bangladeshi Nationals
बांगलादेशी नागरिकांना अटक

By

Published : Aug 2, 2023, 9:17 PM IST

मुंबई : अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव दिनसलम शेख उर्फ दिन्इस्लाम इक्बाल शेख (वय ३५) असे असून दुसऱ्याचे नाव साबु शहादत मीर उर्फ साबु सुरभ मीर (वय ३६) असे आहे. या दोन्ही आरोपींना नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांच्या हवाली देण्यात आले असल्याची माहिती एटीएसचे अधिकारी अनिल कुंभारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई :दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील २ घुसखोर बांगलादेशींना ताब्यात घेतले. आरोपी दिनसलम शेख उर्फ दिन्इस्लाम इक्बाल शेख (वय ३५ वर्षे) आणि साबु शहादत मीर उर्फ साबु सुरभ मीर (वय ३६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही पुढील कारवाईकरिता नेरुळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच २६ जुलैला दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. २०१४ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील बांगलादेशी आरोपी महिलेविरोधात किल्ला कोर्टाने २०१५ मध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मानरा रसुल खान (वय ३२ वर्षे, नवी मुंबई) असे या महिलेचे नाव असून तिला पुढील कारवाईकरिता डी. सी.बी. सी. आय. डी. -1 शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

'या' चार जणांना अटक:त्याचप्रमाणे एटीएसच्या काळाचौकी युनिटने भायखळा पोलीस ठाण्याच्या परिसरातून ४ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. सौम्या संतोष नाईक उर्फ सुलताना शब्बीर खान उर्फ सुलताना संतोष नायर उर्फ टिना (वय २१ वर्षे), सलमान अश्रफअली शेख उर्फ आलमगीर राजू शेख (वय २१ वर्षे), सलीम तय्यब अली उर्फ सलीम खलिल मुल्ला (वय ३४ वर्षे), वसिम रबीउल मोरोल (वय २६ वर्षे) या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भायखळा पोलीस ठाण्यात कलम ३(अ), ६ पारपत्र अधिनियम १९५० सह कलम ३ (१) परकीय नागरीक आदेश १९४८, सह १४ विदेशी व्यक्ती अधिनयम १९४६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल :त्याचप्रमाणे ना. म. जोशी मार्ग, पोलीस ठाण्याच्या परिसरातून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक आरोपीचे बांगालादेशी नाव सलिम तय्यब अली व्यापारी असून भारतीय नाव सलीम खलिल मुल्ला, आणि वसिम रबीउल मोरोल (वय २६ वर्षे) असे आहे. यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग, पोलीस ठाण्यात कलम ६ पारपत्र अधिनियम १९५० सह कलम ३(१) परकीय नागरीक आदेश १९४८, सह १४ विदेशी व्यक्ती अधिनयम १९४६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. Bangladeshi Arrested In Kalyan : कल्याण एसटी डेपो परिसरातून ५ बांगलादेशी महिलांसह भारतीय नागरिकालाही अटक
  2. Mumbai Crime: बोरिवलीत फिरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला, एमएचबी पोलिसांची कामगिरी
  3. Mumbai Crime : अवैधरित्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details