मुंबई -गेल्यावर्षी 3 डिसेंबरला मुंबईत एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी राष्ट्रगीत सुरू (National anthem contempt case) असतानाच स्टेज सोडून निघून गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर भाजप मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राष्ट्रगीत अनादर केल्याप्रकरणी, ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी शिवडी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाने ममता बॅनर्जी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान या सुनावणीवर 21 जानेवारी सत्र न्यायालय निकाल देणार आहे.
न्यायलयातील युक्तीवाद : आज झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबईतील दौरा हा राजकीय होता. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्या CM असल्यानं CM प्रोटोकॉल पालन करून सिक्युरिटी देण्यात आली होती. 2024 मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, त्यांची इतर सर्व राजकीय पक्षांसोबत एकत्रित बैठक साठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांची मुंबई भेट हा पॉलिटिकल अजेंडा होता असे सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे.
राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप : मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या उभे राहून पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या. ही क्लिप सोशल मिडियावर पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. बॅनर्जीचे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून 1971 राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला.