मुंबई :गुजरात मधील वडोदरा येथे गोध्रा हत्याकांडानंतर 2002 मध्ये घडलेल्या बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांना कोर्टामध्ये साक्ष देण्याकरिता हजर न करता आलेल्या गुजरात पोलिसांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने फटकारले ( Sessions Court reprimanded the Gujarat Police ) आहे. पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी दरम्यान साक्षीदारांना हजर करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिली आहे.
बेस्ट बेकरी हल्ला प्रकरण - गुजरात मधील वडोदरा येथील हनुमान टेकरी येथील 1 मार्च 2002 रोजी बेस्ट बेकरी वरील हल्ल्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात साक्षीदारांना हजर न करणाऱ्या गुजरात पोलिसांना चांगले धारेवर धरले होते. गुजरात पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही? आता याबाबत आम्हाला विचार करावा लागेल. आणखी चालढकल चालणार नाही अशी कठोर भूमिका न्यायालयाने घेतली.