मुंबई :ईडी मनी लॉन्ड्रीग प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला ( Suspended police officer Sachin Vaze Bail ) आहे. सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझे यांनी सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीन अर्ज दाखल केला होता. सचिन वाझे यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला होता.
मुक्काम तुरुंगातच :सचिन वाजे प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याने या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ईडीने केला होता.या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याने जामीन देऊ नये सत्र न्यायालयात ( Bombay Sessions Court) ईडीने युक्तिवाद केला होता. मात्र जामिन मिळून सुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने वाझे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहेत.
सत्र न्यायालयाकडून दिलासा :आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामधील ( Money Laundering Case) आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टामध्ये जामिनासाठी मंगळवारी (दि. 15 नोव्हेंबर) रोजी नव्याने अर्ज केला होता. या अर्जावर दोन्हीही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे वाझे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे.
लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर, दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेंनी तपासादरम्यान सांगितले होते.
काय आहे प्रकरण : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.