महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sessions Court : सातारा जिल्ह्यातील आप्पासाहेब देशमुख यांचा दोष मुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला - दोष मुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

आज मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी श्री. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव उर्फ आप्पासाहेब देशमुख ( Appasaheb Deshmukh ) यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला दोष मुक्तीचा अर्ज ( Sessions Court rejected the application ) फेटाळला. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून प्रवेशसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप त्यांच्यावर आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 25, 2022, 10:19 PM IST

मुंबई : सातारा जिल्ह्यातील मायणी येथील श्री. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव उर्फ आप्पासाहेब देशमुख ( Appasaheb Deshmukh ) यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. आज मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी हा अर्ज ( Sessions Court rejected the application ) फेटाळला. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून प्रवेशसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप त्यांच्यावर आहे.

दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला - सातारा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात प्रथम तक्रार दाखल करणाऱ्या सातारा पोलिसांनी सी रिपोर्ट फाईल केला असून त्यामध्ये देशमुख बांधवांना क्लीन चीट देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयत अर्ज करण्यात आला होता. मात्र सातारा पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जाला अद्याप 90 दिवस पूर्ण न झाल्याने या विरोधात इतर कोणीही पुन्हा न्यायालयात दाद मागू शकते. त्यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे 90 दिवसापूर्वी दोष मुक्तीचा अर्ज निकाली काढून शकत नसल्याने देशमुख बंधू यांचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळून लावण्यात येत आहे, असे मत न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी नोंदवले आहे.



काय आहे प्रकरण - श्री. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संस्थेला २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २०० विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०१४ मध्ये मात्र प्रवेश प्रस्ताव फेटाळण्यात आला. २०० प्रवेशाची परवानगी असताना २०० ऐवजी ५५० विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले आणि त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच नाही. प्रवेश आणून देण्यासाठी एका एजन्टचीही नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष महादेव देशमुक आणि इतरांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details