मुंबई :भांडुप येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध (Physical relations with promise of marriage) ठेवल्यानंतर पीडित मुलीने मुलीला जन्म दिला होता. या प्रकरणात आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष POCSO कोर्टात जामीन अर्ज दाखल (filing bail application in special POCSO court) केला होता. आरोपीने पीडित तरुणी सोबत लग्न (marriage with victim girl) आणि बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन (promise to take responsibility of baby) न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाने आरोपी तरुणाचा जामीन मंजूर केला (Sessions Court granted bail to accused youth) आहे. आरोपी तरुणाने लग्नास नकार दिल्याने पीडित तरुणीने मार्च 2020 मध्ये पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. Latest news from Mumbai, Mumbai Crime
लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध-अल्पवयीन पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी 12 मार्च रोजी वीस वर्षीय तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपीने पीडित तरुणीशी संबंध ठेवल्यानंतर मुलाला जन्म दिला होता. पीडित तरुणीने दावा केला की, आरोपी तरुणाने वारंवार भेटत होते. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. नंतर ती गरोदर राहिली आणि मुलाला जन्म दिला असा दावाही पीडित तरुणीने केला आहे. मुलीच्या जन्माच्या नंतर आरोपी तरुणाने लग्नास नकार दिला होता. त्यानंतर पीडित तरुणीने पवई पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
मुलीचा आणि बाळाचा खर्च उचलण्याचे दिले आश्वासन-आरोपीच्या जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान तरुणीने कोर्टात सांगितले की, ती मुलाला सांभाळू शकत नाही. त्यानंतर आरोपीने कोर्टाला आश्वासन दिले की तो आई आणि मुलाची काळजी घेईल. आरोपीच्या वडिलांनीही कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून मुलाचा शैक्षणिक आणि इतर खर्च उचलणार असल्याचे सांगितले. आरोपी आणि त्याच्या वडिलांनी दिलेल्या आश्वासनानंतर न्यायालयाने त्याला पीडित पीडित तरुणीला आणि तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी त्याच्या वडिलांनी लेखी दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागेल या अटीवर त्याला जामीन मंजूर केला.
दोन वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल -लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण POCSO कायदा 2012 च्या तरतुदींखाली नोंदवल्या गेलेल्या दुसर्या एका प्रकरणात 17 वर्षीय तरुणाला त्याच्या वर्गमैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याबद्दल अटक करण्यात आली. ज्यामुळे एप्रिल 2020 मध्ये मुलीने एका मुलीला जन्म दिला. न्यायालयाने त्याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली लावली होती. दोन वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याच्या तपासात सामील होण्यासाठी पोलिसांकडून अनेक समन्स प्राप्त झाल्यानंतर आरोपी स्वतः अल्पवयीन असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली.
अल्पवयीन मुलीकडून बाळाला जन्म-मार्च 2020 मध्ये पीडितेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला होता; परिणामी पीडितेच्या कुटुंबाला ती गर्भवती असल्याचे समजले. तिच्या कुटुंबीयांनी चौकशी केल्यावर तिने सांगितले की, तिच्या शाळेच्या दिवसात ती आरोपीला भेटायची. तिच्या शाळेतील मैत्रिणी आणि त्यांची मैत्री झाली होती आणि त्यानंतर ते एकांतात भेटू लागले होते. ती आणि आरोपी तिच्या एका मैत्रिणीच्या घरी जात असत. अखेरीस तिने 9 एप्रिल 2020 रोजी साकीनाका येथील रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता.