मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) बेस्ट चालकासोबत कुलाबा परिसरात 2008 मध्ये झालेल्या वादातून दोन आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात आरोपींनी बस चालकाला विरोधात केलेले अपशब्द फिर्यादी बस चालक, कंडक्टरला आठवत नसल्याचे निरीक्षण नोंदवत दोन्हीही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कुलाबा परिसरामध्ये एप्रिल 2008 मध्ये कुलाबा डेपोतून आगरकर चौकाकडे जात असताना बेस्ट बस चालकाने घडली ( Assaulting Best Driver ) होती.
आरोपींची निर्दोष सुटका -मुंबई सत्र न्यायालयाने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ट बस चालकाचा हेतुपुरस्सर अपमान केल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे. कारण तक्रारदारांना आरोपीने त्याचा अपमान करण्यासाठी वापरलेले चुकीचे अपमानास्पद शब्द आठवत नसल्याने आरोपी हार्दिक व्यास, शैलेश शहा या दोघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या दोन्ही विरोधात कुलाबा पोलिसांनी आयपीसी कलम 353, 332, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी दोन्हीही आरोपींना निर्दोष सुटका केली आहे.