मुंबई :गॅंगस्टर छोटा राजनला सत्र न्यायलयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Underworld don Dawood Ibrahim ) टोळीतील साथीदाराची हत्या केल्याच्या आरोपातून दोष मुक्तता ( Sessions court acquits gangster Chhota Rajan ) केली आहे. या प्रकरणात दोष मुक्त करण्यात यावे याकरिता छोटा राजनच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने छोटा राजन ला या प्रकरणातून दोष मुक्त केले आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयातील संकेतस्थळावर 10 पानाची सविस्तर ऑर्डर आज उपलब्ध करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Underworld don Dawood Ibrahim ) टोळीतील कथित साथीदार अनिल शर्मा याला 2 सप्टेंबर 1999 रोजी उपनगरीय अंधेरी येथे छोटा राजनच्या साथीदारांनी गोळ्या मारून होत्या केली होती. अनिल शर्मा कथित पणे 12 सप्टेंबर 1992 रोजी येथील जे जे रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या टीमचा भाग होता. दाऊद टोळीने प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्याला मारण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप ( From the charge of killing Dawood accomplice ) आहे. दाऊद आणि राजन टोळ्यांमधील शत्रुत्वामुळे अनिल शर्माची हत्या झाली असा दावा फिर्यादी पक्षाने म्हटले आहे.