मुंबई :मुंबईतील एका जिलेबी विक्री करणाऱ्या व्यवसायिकाने पत्नीसोबत झालेला विवाह बेकायदेशीर असल्याचे म्हणत मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात (Mumbai Metropolitan Magistrate Court ) याचिका दाखल केली होती. ही याचिका महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली होती. याविरोधात पतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, पत्नीच्या आधार कार्डवर पतीचे नाव असल्यास विवाह बेकायदेशीर आहे, असे मानता येणार नाही. त्यामुळे पत्नीला पोटगी देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले (husband name on wife aadhar card is legal marriage) आहे.
आदेश कायम : मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. 45 वर्षीय शहरातील महिलेचे नाव पतीच्या शिधापत्रिकेवर आणि आधार कार्डावर नाव असल्याने पालणपोषणाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाली आहे. पतीने असा दावा केला की, त्यांचे लग्न बेकायदेशीर आहे. पतीकडून याचिकेत असे म्हटले आहे की, पत्नीच्या पहिल्या विवाहानंतर पहिल्या पतीकडून अद्यापही घटस्फोट झालेला नाही आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दोघांमध्ये घरगुती संबंध अस्तित्वात असल्याचे निरीक्षण सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. 61 वर्षीय जिलेबी विक्रेत्याला दरमहा 11000 रुपये आणि त्याच्या पहिल्या पत्नीला 20000 रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले (husband name on wife ration card is legal) आहे.