मुंबई :मुंबई महानगर पालिकेने तीन विभागातील सॅरो सर्व्हेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार तपासणी करण्यात आलेल्या झोपडपट्टीतील 57 टक्के तर इमारतीतील 16 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याच तीन विभागात 10 ऑगस्टपासून पुन्हा सॅरो सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तर, या दुसऱ्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सप्टेंबरमध्ये येईल. त्यानंतरच त्या विभागात किती जणांना कोरोना होऊन गेला आहे स्पष्ट होईल. आजच्या घडीला मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे असे म्हणता येणार नाही. पण मुंबई हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल करत असून हे आशादायी चित्र आहे. पण हर्ड इम्युनिटी तयार व्हायला 60 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, याला पर्याय नाही असे आवाहन यानिमित्ताने तज्ज्ञ करत आहेत.
विशेष बातमी : 10 ऑगस्टपासून 'त्या' तीन विभागात पुन्हा सॅरो सर्वेक्षण - टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई बातमी
मुंबई महानगर पालिकेने तीन विभागातील सॅरो सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार तपासणी करण्यात आलेल्या झोपडपट्टीतील 57 टक्के तर इमारतीतील 16 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याच तीन विभागात 10 ऑगस्टपासून पुन्हा सॅरो सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे
काही दिवसांपूर्वी पालिकेने नीती आयोग आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेकडून(टीआयएफआर) तीन विभागात सॅरो सर्व्हेक्षण करण्यात आले. यात आर उत्तरमधील दहिसर, एम पश्चिममधील चेंबूर आणि एफ उत्तरमधील6936 जणांच्या अँटीबॉडीजची तपासणी केली होती. त्यानुसार यात 70 टक्के नागरिक झोपडपट्टीतील होते. या तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी 57 टक्के नागरिकांमध्ये तर इमारतीतील 16 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही खूप मोठी दिलासादायक बाब मानली जाते. या अहवालानंतर मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु, अद्याप हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाही. कारण इम्युनिटी तयार होण्यासाठी मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के लोकसंख्येत अँटीबॉडीज तयार झाल्यास हर्ड इम्युनिटी तयार झाली असे म्हणता येईल असे तज्ज्ञ सांगत आहेत. पण हा सर्व्हे खूपच दिलासादायक असल्याचे तज्ज्ञही मान्य करत आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही याला हर्ड इम्युनिटी म्हणता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान पालिकेने दोन टप्प्यात सॅरो सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी काही नागरिकांच्या अँटीबॉडीज तपासण्यात येतील. याचा अहवाल सप्टेंबरमध्ये येईल. या दोन्ही सर्वेक्षणाची पडताळणी करत अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतरच किती नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत हे स्पष्ट होईल असे काकाणी यांनी सांगितले आहे. तर, त्यांनीही 60 टक्के लोकांच्या रक्तात अँटीबॉडीज तयार झाल्यास हर्ड इम्युनिटी तयार होईल याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.