मुंबई - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष मंत्रालयात स्वतंत्र स्थापन करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला.
स्वतंत्र कक्ष -
सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय १ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. या शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगासंबंधीची सर्व कामे व सफाई कर्मचाऱ्याशी संबंधित अन्य सर्व बाबी या नवीन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असुन, या कार्यासनास कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक, टंकलेखक आदी पदांसाठी अधिकारी-कर्मचारीदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.