महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाने शेअर बाजार सावरेना; निर्देशांकात पुन्हा ५८१ अंशांची घसरण - मुंबई शेअर बाजार

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ८७९.८३ अंशांनी दुपारी घसरून २७,९८९.६८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २५५.८५ अंशांनी घसरून ८,२१२.९५ वर पोहोचला.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Mar 19, 2020, 10:00 AM IST

Updated : Mar 19, 2020, 4:07 PM IST

मुंबई - जगभरातील कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेअर बाजारामध्ये हाहाकार सुरू झाला आहे. दिवसभर शेअर बाजाराने चढ-उतार अनुभवला आहे. मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ५८१.२८ अंशांनी घसरून २८,२८८.२३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २०५.३५ अंशांनी घसरून ८,२६३.४५ वर स्थिरावला.

बाजार सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) २०४५.७५ अशांनी कोसळला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांकही ५०५.२५ अशांनी गडगडला होता. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ८७९.८३ अंशांनी दुपारी घसरून २७,९८९.६८ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक २५५.८५ अंशांनी घसरून ८,२१२.९५ वर पोहोचला होता.

मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी गेल्या ३८ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. कोरोनामुळे देशासह जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी गुंतवणूकदारांनी भीती आहे. त्यामुळे शेअरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर ७.७८ टक्क्यांनी घसरण-

जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर ७.७८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल १,७४५ रुपये झाले आहेत.

रिलायन्सच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी घसरण-

शेअर बाजारात सर्वाधिक भांडवली मूल्य असलेल्या रिलायन्सचे शेअर ८ टक्क्यांनी गडगडले आहेत. सलग चौथ्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे.

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण सुरू आहे. बजाज फायनान्सचे शेअर १३ टक्क्यांनी तर कोटक महिंद्रा बँक आणि इंण्डसलँँण्ड बँक यांचे शेअर १० टक्क्यांनी घसरले आहेत. एचडीएफसीचे दोन्ही शेअर ७ टक्क्यांनी खाली आले आहेत. सेक्टरल निर्देशांकांमध्ये निफ्टी प्रायव्हेट बँकचा निर्देशांक सर्वाधिक घसरला आहे.

दरम्यान, भारतात आत्तापर्यंत १६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४१ भारतीय आणि २५ परदेशी नागरिकांना लागण झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये ६ तर चंदीगडमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याने त्याचा शेअर बाजारावरही प्रभाव पडत आहे.

Last Updated : Mar 19, 2020, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details