मुंबई :ज्येष्ठ तेलुगू कवी वरावरा राव यांना गडचिरोली येथील दुसर्या सत्र न्यायालयाच्या ( Senior Telugu poet Varavara Rao ) खटल्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी ( Allowed by Session Court to Appear Online in Court ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने दिली ( Varavara Rao Accused in Bhima Koregaon Case ) आहे. गडचिरोलीतील एका प्रकरणात वरावरा राव हे आरोपी आहेत. राव यांनी गडचिरोली न्यायालयासमोर मुंबई न्यायालयाच्या सुविधेचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.
एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्येएल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये कायद्याअंतर्गत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील सात आरोपींना 2018 पासून तर सहा जण 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध करून दिल्या जात नाही तोपर्यंत न्यायालय खटला पुढे करू शकत नाही.