महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा साहित्य संमेलनात विसर; 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाडांना साधे निमंत्रणही नाही - Senior Literary Lakshman Gaikwad

लक्ष्मण गायकवाड यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील धनेगाव हे आहे. जिल्हा विभाजनानंतर त्यांचे गाव लातूर जिल्ह्यात गेले असले तरी त्यांची मूळ ओळख ही उस्मानाबाद जिल्ह्याची असल्याचे त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबीत होते.

mumbai
मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा साहित्य संमेलनाला पडला विसर; 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड यांना साधे निमंत्रणही नाही

By

Published : Jan 10, 2020, 12:32 PM IST

मुंबई -मराठवाड्याच्या मातीला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचा साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विसर पडला आहे. शोषित, वंचितांच्या वेदना ज्यांनी आपल्या साहित्यातून मांडून त्यांचे वास्तव जगासमोर आणले, असे ज्येष्ठ साहित्यिक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांना त्यांच्याच जन्मगावी सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. मराठी साहित्य मंडळासोबत स्थानिक नियोजन समितीचेही गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा साहित्य संमेलनाला पडला विसर; 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड यांना साधे निमंत्रणही नाही

हेही वाचा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत

लक्ष्मण गायकवाड यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील धनेगाव हे आहे. जिल्हा विभाजनानंतर त्यांचे गाव लातूर जिल्ह्यात गेले असले तरी त्यांची मूळ ओळख ही उस्मानाबाद जिल्ह्याची असल्याचे त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबीत होते. त्यांच्याच मूळ जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे. परंतु, त्यांना या संमेलनाचे साधे निमंत्रणही मराठी साहित्य मंडळाकडून देण्यात आले नसल्याने त्यांनी याबाबत आपली खंत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.

हेही वाचा - साहित्याची जत्रा : ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात, हजारो विद्यार्थी एकवटले तुळजाभवानी मैदानात

गायकवाड यांच्या 'उचल्या' या आत्मकथेने मराठी साहित्य विश्वामध्ये एक नवीन वादळ निर्माण केले होते. आज भारतातील अठरा भाषांमध्ये त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. राज्यातील शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा वेदना त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडल्या आहेत. त्यांची आत्तापर्यंत 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतकेच नव्हे तर कर्नाटक पंजाब या राज्यातील विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके अभ्यासक्रमासाठी असून तब्बल सातहून अधिक पुस्तके ही हिंदी भाषेमध्ये प्रचंड गाजलेली आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र आणि जन्मगावही मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याने त्यांना या साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रण मिळाले नसल्याने त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. ज्या जिल्ह्यात माझा जन्म झाला त्या जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असताना मला साधे निमंत्रण येऊ नये, यापेक्षा मोठी वेदनादायी गोष्ट कोणती नाही, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details