महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष मुलाखत : हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला डिवचणे चुकीचे - काँग्रेसचे वरिष्ठ नेते तारीक अन्वर - tariq anwar special interview

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वर्ष चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील समस्येवर काम केले आहे. विशेष करून कोरोनासारख्या महामारीमध्ये त्यांनी योग्य प्रकारे महाराष्ट्र हाताळला आहे. कारण ही एक महामारी नाही तर हा मोठा प्रकोप होता. त्या परिस्थितीत त्यांनी योग्यप्रमाणे महाराष्ट्रात सांभाळला, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते व महामंत्री तारीक अन्वर यांनी व्यक्त केले. ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

senior congress leader tariq anwar
काँग्रेसचे वरिष्ठ नेते तारीक अन्वर

By

Published : Nov 14, 2021, 8:32 PM IST

मुंबई -हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला डिवचणे चुकीचे आहेत, असे मतकाँग्रेसचे वरिष्ठ नेते व महामंत्री तारीक अन्वर यांनी व्यक्त केले. तारीक अन्वर हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, अभिनेत्री कंगना रणौतने वादग्रस्त वक्तव्य, कोरोनाचे महासंकट, ठाकरे सरकारची दोन वर्ष, हिंदुत्त्व या विषयावर ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते तारीक अन्वर यांच्याशी साधलेला विशेष संवाद

प्रश्न - अभिनेत्री कंगना रणौतने देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असे वक्तव्य केले. कंगनाच्या या वक्तव्याविषयी तुम्ही काय सांगाल?

उत्तर -हे फारच दुःखद आहे. मला वाटते याच्यावर भाजप, केंद्र सरकार, प्रधानमंत्री हे अजून गप्प का बसलेले आहेत? त्यांचे गप्प राहणे, या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जर ते कंगणा रणौतच्या वक्तव्याला समर्थन देत असतील तर हे फार घातक आहे. त्याने विलंब न करता याविषयी प्रतिक्रिया द्यायला हवी. त्याचे खंडन करायला पाहिजे. त्याची निंदा व्हायला पाहिजे. त्याचबरोबर स्वातंत्र्याची लढाई आणि आझादी याला ते नाकारत आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होतो.

प्रश्न - कंगनाचं वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्य सेनानी जे शहीद झाले व प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार याचासुद्धा अपमान आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?

उत्तर - नक्कीच अशा लोकांना भारत सरकार सन्मानित करते, ज्यांचे विचार इतक्या खालच्या दर्जाचे आहेत, याच आश्चर्य वाटतं. यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. कंगना राणावत ला दिलेला पद्मश्री पुरस्कार सरकारने परत घेतला पाहिजे.

प्रश्न - काँग्रेस याबाबत आंदोलन करणार का?

उत्तर -आम्ही मागणी करणार आहोत. तसेच यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. कोट्यावधी जनतेने स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. संघर्ष केला. तुरुंगात गेले. फाशीवर चढले. त्यांनी जे बलिदान दिले आहे, ते कसे विसरू शकतो. त्याला कंगना रणौतसारखी अशा पद्धतीची व्यक्ती ठोकर कशी काय मारू शकते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

प्रश्न - आता आपण कोरोनाच्या सावटामधून सावरत आहोत. मोदी सरकारने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. मात्र, हे होत असताना अनेक लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. स्वखर्चाने लस टोचावी लागली. यानंतर 100 कोटी लसीकरणाचे श्रेय मोदी सरकार घेत आहे, याकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर - हे चुकीचे आहे. 100 कोटी लसीकरणाच तुम्ही श्रेय घेता. मात्र, त्यादरम्यान लाखो लोकांचा जीव गेला. त्यांना मेडिकल सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांना औषधे भेटली नाहीत. त्यांना वेळीच लस मिळाली नाही. मग अशा परिस्थितीत त्यांची जबाबदारीसुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. जर श्रेय घेत आहात, तर त्याची जबाबदारीही मोदी सरकारने घ्यावी, असे मला वाटते.

प्रश्न - महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आली. महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी तुम्ही काय सांगाल?

उत्तर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वर्ष चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील समस्येवर काम केले आहे. विशेष करून कोरोनासारख्या महामारीमध्ये त्यांनी योग्य प्रकारे महाराष्ट्र हाताळला आहे. कारण ही एक महामारी नाही तर हा मोठा प्रकोप होता. त्या परिस्थितीत त्यांनी योग्यप्रमाणे महाराष्ट्रात सांभाळला. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना योग्य पद्धतीने त्यांची वाटचाल झालेली आहे. महाराष्ट्रातील समस्यांचे समाधान करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहेत.

प्रश्न - केंद्रातील तपास यंत्रणांच्या कारवाईचा सिलसिलाही महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातील नेत्यांवर कारवाई होत आहे, याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?

उत्तर - देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे होते की, केंद्र सरकार हे त्यांच्या तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने व मोठ्या प्रमाणामध्ये दुरूपयोग करत आहे. सरकार पाडण्यासाठी, तर कधी सरकार स्थापन करण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे.

प्रश्न - ज्या काही तपास यंत्रणाचा ससेमिरा सध्या सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भरणा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो, यावर तुम्ही काय सांगाल?

उत्तर -हे सर्व राजकारणाने प्रेरित आहे. जेव्हा चौकशीमधून काही सत्य बाहेर येईल तेव्हा वस्तुस्थिती समजेल. कोण दोषी, कोण निर्दोष याचा उलगडा तेव्हाच होईल. मात्र, या यंत्रांचा वापर फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर करणे चुकीच आहे.

प्रश्न - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी असे सांगितले की येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका व महाराष्ट्र विधानसभेवर भाजप पूर्ण बहुमताने निवडून येईल. याबाबत तुम्ही काय सांगाल?

उत्तर - हे येणारा काळच सांगेल. मागे राज्यात भाजप सरकार सत्तेत होते. यानंतर त्यांना महाराष्ट्रातील लोकांनी नाकारलं. पुढे त्यांचे प्रयत्न सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न असली. मात्र, मला वाटत नाही. महाराष्ट्रातील लोक भाजपला पुन्हा निवडून आणतील. कारण केंद्रातील मोदी सरकारचा ७ वर्षाचा जो कार्यकाळातील प्रगती अतिशय खराब आहे. निराशाजनक आहे. सर्वच क्षेत्रात मोदी सरकारला अपयश येताना दिसत आहे.

प्रश्न - नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसला राज्यात व देशात बऱ्यापैकी विजय मिळाला. यामुळे कॉंग्रेसमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होण्याचे काम झाले, असे तुम्हाला वाटतं?

उत्तर - नक्कीच. कारण मोदी सरकारला ७ वर्ष झाली व आजही लोकांना स्वप्नच दाखवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा समोर येत आहे. मात्र, तरी आताही मोदी तेच काम करत आहे. जे वचन त्यांनी जनतेला दिली होती, ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. महागाई, शेतकरी, गरिबी सर्वच विषयावर हे सरकार अपयशी ठरले आहे. अर्थव्यवस्था दररोज खालावत आहे. तर बेरोजगारी दररोज वाढत आहे.

प्रश्न - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. विधानसभेत कॉंग्रेस असा विचार करत आहे का?

उत्तर - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी आहे. याचा विचार सर्वस्वी राज्यातील नेते परिस्थितीनुसार करतील. केंद्रीय नेतृत्त्व याविषयी अंतिम निर्णय घेईल. महाविकास आघाडी सरकारसोबत निवडणुका लढवायच्या की स्वतंत्र भूमिका घ्यायची, हा निर्णय शेवटी होईल.

प्रश्न - दोन वर्षापूर्वी सत्ता स्थापनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आली. यावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वावर वारंवार भाजप किंवा मनसेकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत? या विषयाकडे तुम्ही कसे बघता?

उत्तर -हे चुकीचे आहे. तो त्यांचा विषय आहे. असे त्यांना वाटते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समर्थन भेटत चालले आहे. त्यांचा जनाधार वाढत आहे. ते मुख्यमंत्री झाले. भाजप, मनसे आता विरोधाची भाषा वापरायला लागले आहेत. वास्तविक तेव्हाची जी राजकीय परिस्थिती होती. त्या राजकीय परिस्थितीनुसार तीन पक्ष एकत्र आले. अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरोप करणे चुकीचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details