मुंबई - येथील सोमय्या मैदानात युवा महासंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हातातील फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
अन् . . . युवा संगमात तरुणांऐवजी ज्येष्ठ नागरिकांनी लावली हजेरी - ज्येष्ठ नागरिक
युवा महासंगम कार्यक्रमास युवकांऐवजी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
राज्यातील युवकांना खेळातून आकर्षित करून त्यांच्यातील खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषक स्पर्धा राज्यभरात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, सोमय्या मैदानात आयोजित युवा महासंगम कार्यक्रमात या सीएम चषकाचे बक्षिस वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आले.
हा कार्यक्रम युवकांसाठी आयोजित करण्यात आला होता. परंतु, कार्यक्रमाला युवकांऐवजी ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. राज्यातील अनेक भागातून ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते 'वोट फॉर मोदी', 'वोट फार देवेंद्र फडणवीस' असे फलक हातात घेऊन बसले होते. भारतीय जनता पक्षाला मतदान करा, असा संदेश ते या फलकाच्या माध्यमातून देत होते. दरम्यान, हे फलक कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.