मुंबई -भारतीय जनता पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. दर तीन वर्षांनी हे अधिवेशन होत असते. यावेळी सत्ता संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांना बळ देणारे हे अधिवेशन ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला नवी मुंबईत आज (शनिवारी) सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला.
'सत्ता संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अधिवेशन'
आजच्या दिवसभरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या विस्तारकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या 16 फेब्रुवारीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते जयकुमार रावल
आजच्या दिवसभरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या विस्तारकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या 16 फेब्रुवारीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला राज्यातील खासदार, आमदार, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा -अरविंद सावंतांचे अखेर पुनर्वसन; महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्ष