महाराष्ट्र

maharashtra

Mumbai University : मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांवरून गोंधळ! विद्यार्थी संघटनांकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा

By

Published : Jan 25, 2023, 6:01 PM IST

मुंबई विद्यापीठातील पदवीधरांमधून १० सिनेटची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी तयार करण्यात येत आहे. ही मतदार यादी तयार करताना प्रवेश शुल्क आकारले जात आहे. तसेच, प्रस्थापित राजकीय पक्षांना मदत होण्यासाठी नाव नोंदणीची तारीख वाढवून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (दि. २७ जानेवारी)रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai University
मुंबई विद्यापीठ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांना विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पदवीधर मतदार संघातून दहा (दि. १० जानेवारी)रोजी नोंदणीकृत पदवीधरांची नव्याने निवड करण्यासाठी नविन मतदार यादी तयार करण्यात येत असून, त्यासाठी मुंबई विद्यापीठाने जाहिरातीमार्फत पदवीधरांना आवाहन केलेले आहे. परंतु, नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मुंबई विद्यापीठ नोंदणी शुल्क म्हणून (रु. २० आकारत आहे) याबद्दल महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने अनुक्रमे (दि. ११/११/२०२२ आणि २३/११/२०२२ )रोजी विद्यापीठाकडे आक्षेप नोंदवला असून, देखील त्यांनी कोणताही ठोस निर्णय यावर घेतलेला नाही. याउलट नाव नोंदणीची तारीख वाढवून आपण राजकीय प्रस्थपित असलेल्या संघटनेंची मदत केलेली आहे, असा आरोप महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष वकिल. सिद्धार्थ इंगळे यांनी केला आहे.

या आहेत मागण्या :नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पदवीधरांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये व यासाठी आतापर्यंत जे शुल्क आकारण्यात आले ते परत करण्यात यावे. तसेच, (२०२२-२३)साठी नव्याने नोंद होत असलेल्या नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत (२०१० व २०१७)साठी तयार करण्यात आलेल्या पदवीधरांच्या अंतिम मतदार याद्या अद्ययावत करून समाविष्ट करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी (दि. २७ जानेवारी)पासून मुंबई विद्यापीठातील कालिना कॅम्पस येथील आंबेडकर भवन येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशी माहिती इंगळे यांनी दिली आहे.

इस्त्रांनीही सहभागी होण्याचे आवाहन: सिनेट हे विद्यापीठाचे एक महत्वाचे प्राधिकरण आहे, त्याचा अध्यक्ष हा राज्याचा राज्यपाल, कुलपती असतो तरीही सिनेट काय आहे? त्याचा सर्वसामान्य पदवीधरांना काय उपयोग व फायदा तसेच सिनेटचे महत्व, कार्य व कर्तव्ये याचा प्रचार करण्यात मुंबई विद्यापीठ सपशेल अपयशी ठरले आहे. फक्त राजकीयदृष्ट्या प्रस्थापित संघटनांसाठी सिनेट निवडून आयोजित केली जाते व त्यांचेच उमेदवार हे वर्षानुवर्षे निवडून येत राहीले आहेत. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी या लढ्यामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनला सहकार्य करून आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सिद्धार्थ इंगळे यांनी केले आहे.

हेही वाचा :बीबीसी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवरून जामिया इस्लामियात गोंधळ, चार विद्यार्थी ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details