महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hapus Mangoes : हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; 'असा' ओळखा ओरिजनल हापूस - The famous Hapus Mango of Ratnagiri

कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्रीचे प्रकार वाढत आहे. रत्नगीरीतील प्रसिद्ध हापूस आंबा म्हणुन कर्नाटकातील आंब्याची विक्री बाजारपेठेत होतांना दिसत आहे. यामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांना फटका बसत असल्याची माहिती आंब्याच्या व्यापाऱ्यांने दिली आहे.

Hapus Mangoes
Hapus Mangoes

By

Published : Apr 15, 2023, 5:38 PM IST

Updated : May 8, 2023, 2:17 PM IST

हापूसच्या आंब्याच्या नावाखाली मिळतो कर्नाटकाचा आंबा

मुंबई : आंब्याचा हंगाम सुरू झाला असून बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. अशात यंदा अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसल्यामुळे कोकणातील हापूस आंब्याची आवक जरी कमी प्रमाणात असली तरीसुद्धा कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला आहे. हा आंबा हापूस आंबा म्हणून स्वस्त दरात बाजारात सहज उपलब्ध आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणून या आंब्याची विक्री होत असल्याने ग्राहकांची सुद्धा फसवणूक होत आहे.





कर्नाटक आंब्याची मागणी वाढली : आंब्याचा हंगाम सुरू झाल्यावर सर्वात जास्त विचारणा होते ती कोकणातील हापूस आंब्याची. रत्नागिरी हापूस असेल, देवगड हापूस असेल या आंब्याला सर्व सामान्य जनतेची मोठी मागणी असते. परंतु यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे त्याचा फटका कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादकांना बसला असून यंदा आंब्याची आवक इतर वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे. त्यातच बाहेरून दिसणारा टवटवीत आंबा आताच झालेल्या अवकाळी पावसामुळे आतून खराब होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बाजारात यंदा रत्नागिरीतील देवगड हापूस आंब्याबरोबर अजून एक आंबा हापूस म्हणून स्वस्त दरात विकला जात आहे. तो म्हणजे कर्नाटकचा आंबा. हा कर्नाटकचा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून हापूस दराच्या तुलने तो निम्म्यापेक्षा कमी दरामध्ये विकला जात असल्याने ग्राहकांची सुद्धा त्याला खरेदी करण्यासाठी मोठी पसंती आहे.





कर्नाटकी आंबा, हापूस आंब्यात कसा आहे फरक? : हा कर्नाटकचा आंबा जवळपास कोकणातील हापूस आंब्यासारखाच दिसतो. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस कर्नाटकचा आंबा एकत्र ठेवल्यानंतर यामधून ह्या आंब्याची ओळख करणे सुद्धा सामान्य माणसाला कठीण होते. अनेकदा आंब्याच्या वास घेतल्यानंतर तो हापूस आहे की नाही हे समजते. अशा परिस्थितीत अनेक व्यापारी ह्या कर्नाटकच्या आंब्यांसोबत रत्नागिरी किंवा देवगडच्या हापूस आंबे ठेवतात. ग्राहकांना त्या आंब्याची चव चाखायला देतात. हा आंबा स्वस्त असल्याने ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो खरेदी करतात. परंतु वास्तविक हा आंबा खाल्ल्यानंतर त्याची चव समजते. चवीला आंबट गोड, त्याचबरोबर आतून फिकट रंग या आंब्याला असतो. हापूस आंबा चवीला गोड असतो. आतून केशरी रंगाचा असतो हापूस आंबा बघायला देठाकडून थोडासा दबलेला दिसतो. जसजसा तो तयार होत जातो तसा देठाचा भाग आतमध्ये दबला जातो. तसेच हापूस आंब्याला एक प्रकारचा सुगंध येतो. या कर्नाटकी आंब्याला तो सुगंध येत नाही.





आंबा खाल्ल्यावरच हापूस समजतो : हापूस आंबा असल्याचे सांगत किलोच्या भावात सुद्धा विकला जातो. रस्त्यावरील दुकाने, रेल्वे तसेच बस स्थानकाबाहेर, शॉपिंग मॉल, सिग्नल जवळील फेरीवाले अशाप्रकारचे आंबे विक्री करतात. किलोच्या दरासोबत, डझनच्या दराने सुद्धा हे आंबे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. आंबा व्यापारी शंकर नाईकडे यांच्या म्हणण्यानुसार बाजारात हापूस आंब्यालाच मागणी मोठ्या प्रमाणात आहे. वर्षानुवर्षे हापूस आंबा आवडीने खाणारे तीच चव बाजारात दरवर्षी शोधत असतात. परंतु सध्या वाढत्या महागाईत कर्नाटकचा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागला असून तो स्वस्त असल्याने ग्राहक तो आंबा घेऊन जातात. परंतु तो खाल्ल्यानंतरच त्याची चव समजते व नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात येते.









कर्नाटकचा कच्चा आंबा मुंबईत पिकवला जातो : यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणात आंबा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम आंब्याच्या पिकावर सुद्धा झाला आहे. बाहेरून दिसणारे ताजे फळं आतून बऱ्याचदा खराब सुद्धा निघत आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा आंबा मुंबईत आणला जातो. इथे तो पिकवून नंतर बाजारात विकला जातो. घाऊक फळ बाजारात दररोज १०० गाड्या हापूस आंब्याच्या येतात. त्यातील ४० ते ५० गाड्या कर्नाटक आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या आंब्याच्या असतात. कर्नाटकातील आंबा हा २५० ते ४०० रुपये डझनच्या भावाने विकला जातो. तर दुसरीकडे हापूस आंब्याची सुरुवातच कमीत कमी ७०० ते ८०० रुपयांपासून होत असल्याने ग्राहकांना हा आंबा परवडत नाही. म्हणून ते कर्नाटक आंब्याला पसंती देतात. परंतु हापूस आंबा म्हणूनच ते तो विकत घेत असतात. हा आंबा स्वस्त असल्याने ग्राहक नक्कीच याला पसंत करतात.

Last Updated : May 8, 2023, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details