मुंबई - कोरोनाच्या लढ्यात जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. अशीच मदत आता गावखेड्यातील बचत गटाच्या महिलांनी केली आहे. या महिलांनी स्वकमाईतील रक्कम जमा करत 11 लाख 35 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या माध्यमातून ही मदत देण्यात आल्याची माहिती माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी दिली आहे.
बचत गटातील महिलांकडून 'माविम'च्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 लाख 35 हजारांची मदत - बचत गटांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
राज्यावर कोरोनाचे संकट असून या संकट काळात माविम आणि बचत गट प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. कुठे बचतगटाच्या महिला मास्क तयार करत आहेत, तर कुठे शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरीबांना घास भरवत आहेत. गरीबांना अन्न धान्य वाटप करत आहेत.
राज्यावर कोरोनाचे संकट असून या संकट काळात माविम आणि बचत गट प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. कुठे बचतगटाच्या महिला मास्क तयार करत आहेत, तर कुठे शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरीबांना घास भरवत आहेत. गरीबांना अन्न धान्य वाटप करत आहेत. कोरोनाच्या लढाईतील त्यांचे हे काम उल्लेखनीय आहे. हे काम खूप मोठे असताना बचत गटाच्या महिलांनी स्वकमाईतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बचत गटांनी स्वकमाईतून 1 रुपया याप्रमाणे मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला महिलांनी साथ देत काही दिवसांतच 11 लाख 35 हजार रुपये जमा केले. ही मदत नुकतीच मुख्यमंत्री निधीला देण्यात आली आहे. बचत गटातील गरीब महिलांची ही मदत खरच कौतुकास्पद आहे.