मुंबई - यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकही आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जास्त सजग झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल डिस्टन्सिंगपाळून 'पर्यावरण स्नेही गणोशोत्सव' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्यावतीने सीड गणेशाचे वाटप करण्यात येणार आहे.
मनसेच्यावतीने सीड गणेशाचे वाटप; जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन - मनसे सीड गणेश मूर्ती न्यूज
गणेश भक्तांनी कोरोनाच्या संकटात देखील आनंदोत्सव साजरा करावा म्हणून मनसेने पुढाकार घेतला आहे. वांद्रे पूर्व विभागातील वांद्रे, खार, सांताक्रुझ येथील गणेश भाविकांसाठी नाममात्र मुल्य घेऊन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मनसेकडून गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीत आपण वेगळ्या पद्धतीने आपले सण आणि उत्सव त्यांचे मांगल्य व पावित्र्य जपत साजरे करणे गरजचे आहे. गणेश भक्तांनी कोरोनाच्या संकटात देखील आनंदोत्सव साजरा करावा म्हणून मनसेने पुढाकार घेतला आहे. वांद्रे पूर्व विभागातील वांद्रे, खार, सांताक्रुझ येथील गणेश भाविकांसाठी नाममात्र मूल्य घेऊन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मनसेकडून गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली.
'सीड गणेशा' या संकल्पनेमध्ये मातीच्या गणेशमूर्तीमध्ये एक 'बी' टाकलेले असते. या मूर्तीचे घरातच विसर्जन करून त्यातून नवीन रोपटे तयार केले जाते. या संकल्पनेमुळे विसर्जनासाठी होणारी गर्दी तर टाळता येणारच आहे सोबतच वृक्षारोपणही होणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.