महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग, सुरक्षारक्षकाला अटक - Kurar DNA hospital woman molestation news

कुरार परिसरामध्ये असलेल्या एका खासगी रुग्णालयात कोविड सेंटरमधील कोविड बाधित 21 वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली एका सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी रुग्णालयाला भेट देत घटनेची माहिती घेतली.

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग
कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

By

Published : Nov 6, 2020, 1:30 PM IST

मुंबई -कुरार परिसरामध्ये असलेल्या एका खासगी रुग्णालयात कोविड सेंटरमधील कोविड बाधित 21 वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली एका सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आलेली आहे.

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग
गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सुरेश कोचेवाड या सुरक्षारक्षकाला अटक केलेली आहे. कुरार परिसरात असलेल्या डीएनए या खासगी रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले असून या ठिकाणी सुरेश कोचेवाड ह्याची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. गुरुवारी रात्री उशिरा हा आरोपी या रुग्णालयाच्या मागील गेटवर तैनात असताना अचानक पहिल्या मजल्यावर गेला व तेथील कोविड सेंटरमधील झोपलेल्या एका 21 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या आरोपीने केला. झोपेतून अचानक जागे होऊन घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सुरक्षारक्षकाला जागेवरच पकडण्यात आले होते. कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या संदर्भात या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या - किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमैया यांनी डीएनए रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी डॉक्टरांकडून घटनेबद्दल माहिती घेतली. यानंतर सोमैया यांनी मुंबईमध्ये सहापेक्षा जास्त कोविड सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग झाल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत, असे म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बाकीची स्टंटबाजी बंद करून विशेष करून कोविड हॉस्पिटल आणि कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेचे व्यवस्था करावी, अस सोमैया म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details