मुंबई -अयोध्या राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लगले होते. मुंबई पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात भारतीय दंड विधान कलम 144 लागू असेल.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू - मुंबई शहरात कलम 144 लागू
मुंबई पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात कलम 144 लागू असेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू
हेही वाचा -अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस
या काळात जाहीर सभा घेणे, 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येणे, वाहनातून जमावाला घेऊन येणे याप्रकारच्या वागणुकीला बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे. तसेच, दोषींवर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. या काळात जर परवानगी घेऊन सभा घेणाऱ्यांवर मात्र, पोलीस कारवाई होणार नाही.
Last Updated : Nov 9, 2019, 12:43 PM IST