मुंबई -कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबई पोलिसांनी शहरात मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. हे निर्बंध 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असतील. या काळात चार किंवा त्यापेक्षा जास्त जणांनी एकत्र जमण्यावर बंदी असणार आहे.
मिशन बिगिन अगेनच्या नियमांनुसार काही सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
महानगरपालिका अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात जमावाच्या सर्व हालचालीं प्रतिबंधित आहे अत्याआवश्यक सेवा वगळता, सर्व हालचालीवर प्रतिबंध असणार आहे. यामधून आपात्कालिक सेवा, सरकारी अधिकारी व कर्मचारी, जीवनाश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा व सुविधा, औषधालय, टेलिफोन व इंटरनेट सेवेतील कर्मचारी, वीज व इंधन सेवा पुरविणारे अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी, किराणा व अन्न पुरविणारे कर्मचारी, पाणी पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक व्यवस्था यांना सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा -सुशांतसिंह मृत्यू प्रकरण ; पुढील आठवड्यात अंतिम वैद्यकीय रिपोर्ट सीबीआयकडे सादर होणार