महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुरळक घटना वगळता राज्यातील १० लोकसभा मतदारसंघात ६१.२२ टक्के मतदान - , election

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघांत मतदान पार पडले. यावेळी अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

पोलीस व्हॅन फोमतदान करण्यासाठी आलेले नागरिक डली

By

Published : Apr 18, 2019, 7:20 AM IST

Updated : Apr 18, 2019, 11:16 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघांमध्ये किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. राज्यात दुसऱ्या टप्प्यात ६१.२२ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दिवसभरातील राज्यातील घडामोडी -

  • सायं ७.०० : बुलडाण्यात ६ वाजेपर्यंत ६२.५० मतदान
  • राज्यात ५ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
  1. बुलडाणा - ५७.०७ टक्के
  2. अकोला - ५४.३२ टक्के
  3. अमरावती - ५५.४६ टक्के
  4. हिंगोली - ६०.६८ टक्के
  5. नांदेड ६०.९७ टक्के
  6. परभणी - ५८.३३ टक्के
  7. बीड - ५८.३५
  8. उस्मानाबाद - ५७.०६ टक्के
  9. लातूर - ५७.८८ टक्के
  10. सोलापूर - ५२.०२ टक्के
  • दुपारी ५.२८ : लातुरात ५ वाजेपर्यंत ५६.६८ टक्के मतदान
  • दुपारी ५.२७ : परभणी ५ वाजेपर्यंत ५५.५३ टक्के मतदान
  • दुपारी ४.१२ : राज्यातील १० जागांची दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
  1. बुलडाणा- ४५.९४ टक्के
  2. अकोला- ४५.३९ टक्के
  3. अमरावती-४५.६३ टक्के
  4. हिंगोली-४९.१३ टक्के
  5. नांदेड - ५०.०४ टक्के
  6. परभणी - ४८.४५ टक्के
  7. बीड - ४६.२९ टक्के
  8. उस्मानाबाद - ४६.१३ टक्के
  9. लातूर - ४८.१९ टक्के
  10. सोलापूर - ४१.४७ टक्के
  11. एकुण - ४६.६३ टक्के
  • दुपारी ४. १० - दुपारी ३ पर्यंत लातुरात ४८.१९ टक्के मतदान झाले आहे. लातुरात एकूण पुरूष मतदार ९ लाख ९१ हजार ९५०, तर ८ लाख ९१ हजार ५४६ महिला मतदार आहेत. तसेच ९ तृतीयपंथी मतदार आहेत. असे एकूण १८ लाख ८३ हजार ५३५ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी ३ वाजेपर्यंत ८३ हजार ६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
  • दुपारी ४.१० : दुपारी ३ पर्यंत परभणीत ४८.४५ टक्के मतदान
  • दुपारी ४. ०० : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सौंदाणा आणि वाकडी या गावातील १ हजार ७४० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या दोन्ही गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही.
  • दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वा. पर्यंत झालेले मतदान
  1. बुलडाणा - ३४.४३ टक्के,
  2. अकोला - ३४.४६ टक्के,
  3. अमरावती - ३३.६८ टक्के,
  4. हिंगोली - ३७.४४ टक्के
  5. नांदेड - ३८.१९ टक्के
  6. परभणी - ३७.९५ टक्के
  7. बीड - ३४.६५ टक्के,
  8. उस्मानाबाद - ३४.९४ टक्के
  9. लातूर - ३६.८२ टक्के
  10. सोलापूर - ‎३१.५६ टक्के.
  • १.४५: हिंगोली जिल्ह्यातील करवाडी येथे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. रस्त्यासह विविध सोयी सुविधा नसल्यामुळे बहिष्कार टाकला
  • १२.४४ : मतदान केंद्रांमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी असताना सुद्धा उस्मानाबाद येथील एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रणव पाटील याने फेसबुक लाईव्ह केले. या महाभागाने चक्क व्हीव्हीपॅट यंत्राचे चित्रण लाईव्ह केले. अद्याप कोणतीही कारवाई नाही.
  • १२.०५: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेवडी मतदान केंद्राबाहेर गर्दी झाल्यामुळे पोलीस आणि नागरिकांत वाद. ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी फोडली. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला. पोलीस उपनिरिक्षक जखमी
  • ११.४५: बीडमधील कुंभारी गावाचा मतदानावर बहिष्कार
  • ११ वाजेपर्यंत १० मतदार संघात २१.४७ टक्के मतदान झाले
  • मतदार संघानुसार आकडेवारी
  1. हिंगोली - २४. ०८ टक्के
  2. परभणी - २६. १७ टक्के
  3. बुलडाणा - २०.४९ टक्के
  4. अकोला - २१.०३ टक्के
  5. अमरावती - २०.६ टक्के
  6. नांदेड - २४.४० टक्के
  7. बीड - १८.९४ टक्के
  8. उस्मानाबाद - २०.०९ टक्के
  9. लातूर - २३.१४ टक्के
  10. सोलापूर - १६.५०
  • ११.३०: अकोल्यामध्ये ईव्हीएमची तोडफोड, तोडफोड करणारा श्रीकृष्ण प्यारे पोलिसांच्या ताब्यात
  • ११.१५: लातूरमधील १०५ वर्षांच्या कबईबाई कांबळे यांनी केले मतदान. हरंगूळ बुद्रूक येथील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर बसून त्या कुटुंबीयांसह आल्या होत्या.
  • १०.४५ : हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी ग्रामस्थांशी वाद घातल्याने, मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला. पोलिसांनी मद्यपान केले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्री दिलेले जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून त्यांनी जेवण फेकून दिले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
  • १०.१५: राज्यात पहिल्या २ तासांत ७.८६ टक्के मतदान
  • १०.११ : अमरावतीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पती रवी राणांसह केले मतदान
  • १०.००: ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी

परभणी - ५.३० टक्के
नांदेड - ७.४७ टक्के
लातुर - ७.५० टक्के
हिंगोली - ७.५६ टक्के
अकोला - ७.५६
उस्मानाबाद - ८. ६६ टक्के

  • ९.३५ : निवडणुक विभागाच्या वतीने बंद पडलेली मतदान यंत्रे बदलण्यासाठी दुसऱ्या यंत्रांची व्यवस्था करण्यास सुरुवात
  • ९.३४ : हिंगोलीतील गणेशवाडी येथील मतदान कर्मचारी जाणुनबुजुन मतदान यंत्र बंद पाडत असल्याचा एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप
  • ९.३४ : हिंगोलीतील गणेशवाडी येथील जिल्हापरिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४ येथे सकाळी ७ वाजल्यापासून ३ वेळा मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ
  • ९.२७ : हिंगोलीत १४ मतदान केंद्रावर ३१३ जणांची नावे मतदार यादीत सापडत नसल्याने गोंधळ
  • ९.२५ : लातुर येथे अमित देशमुख यांनी सहकुंटुंब केले मतदान
  • ९.१५ : बीडमधील धारुर येथील मतदान पुर्ववत, मतदान यंत्रात झाला होता बिघाड
  • ९.१० : सोलापुरात दमाणीनगर येथील शाळेतील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने, मतदान २ तास उशिराने सुरु
  • ९.०६ हिंगोली जिल्ह्यातील भगवती, कोंडवाडा आणि आजगाव याठिकाणी मशिन बंद पडल्या, मशिन बदलल्यानंतर मतदान पुर्ववत
  • ९.०४ : माजलगाव तालुक्यातील आलापुर बुध येथे १ तासापासून ईव्हीएम मशिन बंद, मतदान प्रक्रिया बंद
  • ८.५८ : सोलापुरमध्ये महाराष्ट्राचे पणन, वस्त्रोद्योग आणि सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केले मतदान
  • ८.५७: सोलापुरात अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, सकाळी ८ नंतर मतदान प्रक्रिया पुर्ववत
  • ८:५५ : अमरावतीत काँग्रेस आमदार आणि राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकुर यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.५५: सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.५०: लातुरमध्ये माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.४३ -बीड मतदारसंघात ५ ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड. गेवराई, माजलगाव, केज, आष्टी, परळी या ५ ठिकाणी बिघाड. यानंतर तात्काळ मशिन बदलण्यात आले. मतदान पुर्ववत सुरु - बीड जिल्हाधिकारी अस्तिक पांडे यांची माहिती.
  • ८.३८: लातुरात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.२१: बीडमधील धारुर येथे मतदान यंत्रात बिघाड
  • ८.१५: उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावातील बुथ क्रमांक २५९ वर मतदान यंत्र बिघडले
  • ८.११: तब्बल १ तासाच्या बिघाडानंतर हरंगुळ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पुर्ववत
  • ७.५२: लातुरमध्ये हरंगुळ मतदान केंद्रावर वोटिंग मशीन पडले बंद
  • ७.२९ : सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केले मतदान
  • ७.२०: अमरावती मतदारसंघातील मोझरी येथील मतदान केंद्रावर २० मिनिटे उशिराने मतदानाला सुरुवात
  • ७.०८: सोलापुरात सुशिलकुमार शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
  • ७.०० : राज्यातील १० मतदार संघात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.
Last Updated : Apr 18, 2019, 11:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details