मुंबई- परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या कामगार संघटना आणि काही सीफेरर्स अधिकारी संघटनांचा भारतात प्रथमच एक राष्ट्रीय परिषद होणार आहे. परदेशात जहाजांवर काम करताना कामगारांना येणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्न यावर चर्चा करण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद येत्या १६ जून रोजी नवी मुंबई येथे होणार आहे.
सिफेरर्सची ही भारतातील पहिली परिषद आहे. या परिषदेला सिफेरर्स कन्फेडरेशन ऑफ इंडिया, असोसिएशन कन्फेडरेशन ऑफ इंडिया - अंदमान आणि निकोबार, असोसिएशन ऑफ मरीन इलेक्टरो टेकनिकल ऑफिसर्स या तीन जहाजांवरच्या अधिकाऱ्यांच्या संघटना आणि जहाजांवरचे कामगार सेलर युनियन ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेला जगदीश्वर राव हे कामगारांच्या विविध समस्या व त्यांचे हक्क यांच्यावर भाषण करणार आहेत. वर्षाला अडीच लाख ते तीन लाख कामगार परदेशात जहाजांवर कामासाठी जातात. भारताला १० बिलियन डॉलर इतका उत्पन्न या सीफेरर्स कामगारांच्या उत्पन्नातून मिळतो. एवढा मोठा उत्पन्न भारत सरकारला येत असताना देखील भारत सरकार या कामगारांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी अधिकारी व कामगारांनी ही परिषद बोलावली आहे.