महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन तर्फे 'सी टू स्काय' ही अनोखी आणि साहसी मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. महत्वाच्या सामाजिक विषयासह सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेल्या उपचार पद्धतीसंबंधी जनजागृती करता यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम

By

Published : Mar 24, 2019, 2:13 PM IST

मुंबई - महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन तर्फे 'सी टू स्काय' ही अनोखी आणि साहसी मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. महत्वाच्या सामाजिक विषयासह सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेल्या उपचार पद्धतीसंबंधी जनजागृती करता यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम


या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथम उपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेली उपचार पद्धती माहीत पडावी हा उद्देश आहे. ही उपचार पद्धती म्हणजे सिपीआर (कर्डीक पुलोमनरी रेसुसीऍशन) आहे. तिच्या जनजागृतीसाठी व पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासावर तोडगा काढण्यासाठी, तसेच शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेविषयी महाजन बंधुंनी व काही डॉक्टरांनी एकत्र येत या सी टू स्काय या मोहिमेची माहिती दिली.

मुंबई ते काठमांडू, भोपाळपर्यंत सायकलिंग, ट्रेकिंग करत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. काठमांडूवरून त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर काही गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट चढणार आहेत. या मोहिमेत सायकलिंग व गिर्यारोहक प्रशिक्षक तसेच डॉक्टर्सदेखील मार्गदर्शन करणार व या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ही मोहीम ३१ मार्च रोजी गेट ऑफ इंडिया येथून सुरू होईल त्यानंतर ती पुढे पंधरा दिवसापर्यंत सुरू राहील. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details