महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरळ सेवा भरतीच्या चाचणी परीक्षा एक व दोन डिसेंबरला होणार

राज्यामध्ये गेल्या पंधरा दिवस सरळ सेवा भरती जिल्हा परिषदेच्या भरती पोलीस भरती उच्च अधिकाऱ्यांच्या भरती यासंदर्भात प्रचंड असंतोष सुरू आहे, याचे कारण 2019 पासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होऊ नये, त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

By

Published : Nov 5, 2022, 11:37 AM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई -राज्यामध्ये गेल्या पंधरा दिवस सरळ सेवा भरती जिल्हा परिषदेच्या भरती पोलीस भरती उच्च अधिकाऱ्यांच्या भरती यासंदर्भात प्रचंड असंतोष सुरू आहे, याचे कारण 2019 पासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होऊ नये, त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र शासनाने डिसेंबर एक व दोन रोजी चाळणी परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीसाठी विविध संवर्गांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबरला घेण्यात येणार आहे.

7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणारे आणि अनेकदा नोकऱ्यांसाठी ज्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली, अशा लाखो विद्यार्थ्यांनी जे बेरोजगार आहेत त्यांच्याकडून शासनाच्या भरतीबाबत आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. ग्रामविकास विभागाने त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन देखील केलेले आहे. त्यामुळे शासनाने ही संगणक प्रणाली आधारित चाळणी परीक्षा घेण्याचे ठरवलेले दिसते असे सूत्रांची माहिती आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details