महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नौदलाची ताकद वाढणार; स्कॉर्पियन बनावटीच्या 'आयएनएस वेला'चे माझगावमध्ये जलावतरन - Indian Naval service

लवकरच 'आयएनएस वागीर' आणि 'आयएनएस वागशीर' या दोन्ही पाणबुड्यांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. स्कॉर्पियन बनावटीच्या पाणबुड्या भारतीय नौदलात शामिल झाल्यानंतर नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे.

'आयएनएस वेला'चे माझगावमध्ये जलावतरन

By

Published : May 6, 2019, 4:34 PM IST

मुंबई- भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट ७५' अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या स्कॉर्पियन श्रेणीच्या ६ पाणबुड्यांपैकी 'आयएनएस वेला' या चौथ्या पाणबुडीच आज मुंबईतील माझगाव डॉक येथे जलावतरन करण्यात आले. मात्र, भारतीय नौदलात सामील होण्यासाठी 'आयएनएस वेला' या पाणबुडीच्या आता विविध चाचण्या समुद्रात घेतल्या जाणार आहेत. या पाणबुडीवर अत्याधुनिक शस्त्रे जोडण्यात आली असून आता या पाणबुडीच्या नौदलाकडून शेकडो टेस्ट घेण्यात येणार आहेत.

'आयएनएस वेला'चे माझगावमध्ये जलावतरन

मुंबईतील माझगाव डॉकमध्ये फ्रांसच्या डिसीएनएस व माझगाव डॉक यांच्या माध्यमातून २००५ ला करण्यात आलेल्या करारानुसार 'प्रोजेक्ट ७५ च्या अंतर्गत सहा पाणबुड्या बांधल्या जात आहेत. त्यापैकी आयएनएस वेला' ही पाणबुडी बांधण्यात आली आहे. तिचे आज जलावतरन करण्यात आले.

'आयएनएस वेला'चे माझगावमध्ये जलावतरन

यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये 'आयएनएस कलवरी' ही पाणबुडी भारतीय नौदलात सामील करण्यात आली आहे. तसेच आयएनएस खंदारी व आयएनएस करंज या दोन पाणबुड्या लवकरच भारतीय नौदलात सामील केल्या जाणार आहेत. आयएनएस वेला या पाणबुडीच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लवकरच 'आयएनएस वागीर' आणि 'आयएनएस वागशीर' या दोन्ही पाणबुड्यांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. स्कॉर्पियन बनावटीच्या पाणबुड्या भारतीय नौदलात शामिल झाल्यानंतर नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे.

'आयएनएस वेला'चे माझगावमध्ये जलावतरन

ABOUT THE AUTHOR

...view details