मुंबई-दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ प्रकल्पातील आता आणखी एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. या प्रकल्पासाठीचे सिसर क्रॉसओव्हर शनिवारी साइटवर दाखल झाले आहेत. या सिसर क्रॉसओव्हरचा उपयोग मेट्रो गाड्यांचा मार्ग बदलण्यासाठी केला जातो. सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ठ पद्धतीची मार्ग रचना आहे. त्यानुसार हे सिसर क्रॉसओव्हर चारकोप मेट्रो आगार कडे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने दिली आहे.
हरियाणा येथील सोनिपतमधील मे. व्ही.ए.इ.-व्ही.के.एन. या भारतीय कंपनीने या सिसर क्रॉसओव्हरचे उत्पादन केले आहे.तर या उत्पादनासाठी वापरण्यात आलेले रूळ हे वोइस्टलपाईन या ऑस्ट्रेलियन कंपनीकडून आयात केले गेले आहेत.