महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Scientist cheated by fraud : सायंटिस्टला भामट्याने घातला १३ लाखांचा गंडा, कमी पैशात ऍडमिशन करून देण्याचे दाखवले आमिष - Trombay

सायंटिस्टला त्यांच्या मुलीला कमी पैशात एम. बी. बी. एस. ऍडमिशन मिळवून देण्याचे (lured to get admission for less money) आमिष दाखवून, लाखो रुपयांना गंडा (Scientist cheated by fraud of 13 lakhs) घातला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scientist cheated by fraud
१३ लाखांचा गंडा

By

Published : Nov 9, 2022, 5:37 PM IST

मुंबई : सायंटिस्टला त्यांच्या मुलीला कमी पैशात एम. बी. बी. एस. ऍडमिशन मिळवून देण्याचे (lured to get admission for less money) आमिष दाखवून, लाखो रुपयांना गंडा (Scientist cheated by fraud of 13 lakhs) घातला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५५ वर्षीय शिवाजी चरण दास यांची फसवणूक झाली असून; त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


ट्रॉम्बे (Trombay) येथील बीएआरसी कॉम्प्लेक्समधील कांचन गंगा या इमारतीत राहणारे सायंटिस्ट शिवाजी चरण दास यांना त्याच्या मुलीला कमी पैशात ऍडमिशन करून देतो सांगून, एका भामट्याने १२ लाख ६६ हजारांना गंडा घातला आहे. शिवाजी यांची मुलगी ममीक्षा हिला बंगलोर, कर्नाटक येथील केम्पो गोवडा येथे एमबीबीएससाठी कमी पैशात ऍडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ पासून आजतागायत आरोपीने शिवाजी यांच्याकडून टप्प्याटप्प्यानं १२ लाख ६६ हजार रुपये उकळले. मात्र, कोणतेही ऍडमिशन न देता आणि शिवाजी यांनी दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली, म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


8 नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजून १९ वाजता दास यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिल्ली आणि बंगलोर येथे राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details