महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांद्रयान-2 मोहीम : लँडरशी संपर्क तुटला, परंतु अजूनही आशा जिवंत - शास्त्रज्ञ अरविंद परांजपे - इस्रो

भारताचे महत्वाकांक्षी असलेले चांद्रयान-२ हे काल (शनिवारी) मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र, केवळ २ किमी अंतरावर यान असताना लँडर विक्रमशी असणारा संपर्क तुटला. मात्र, अद्यापही आशा जिवंत असल्याचे मत नेहरू तारांगणचे संचालक शास्त्रज्ञ अरविंद परांजपे यांनी व्यक्त केले.

शास्त्रज्ञ अरविंद परांजपे

By

Published : Sep 7, 2019, 7:24 PM IST

मुंबई - भारताचे महत्वाकांक्षी असलेले चांद्रयान-२ हे काल (शनिवारी) मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र, केवळ २ किमी अंतरावर यान असताना लँडर विक्रमशी असणारा संपर्क तुटला. मात्र, अद्यापही ही मोहीम अपयशी ठरली असे म्हणता येणार नाही, अद्यापही आशा जिवंत असल्याचे मत नेहरू तारांगणचे संचालक शास्त्रज्ञ अरविंद परांजपे यांनी व्यक्त केले.

यानाचा संपर्क तुटण्याआधी आपल्याला काही माहिती मिळाली आहे. ती नक्कीच आपल्या कामाला येणार आहे. अजूनही संपर्क होऊ शकतो, पण तो कधी होईल हे मात्र सांगता येणार नाही. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असे नेहरू तारांगणचे संचालक शास्त्रज्ञ अरविंद परांजपे यांनी सांगितले.

शास्त्रज्ञ अरविंद परांजपे

यानाचा संपर्क का तुटला याचे नेमके काय कारण हे आपण सांगू शकत नाही. इस्रोमध्ये काम करणारे शास्त्रज्ञच आपल्याला सांगू शकतील. येत्या काही दिवसांमध्ये संपर्क करण्यात ते यशस्वीही होऊ शकतील. त्याचबरोबर यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना त्याने आपल्याला अनेक प्रकारे डेटा पाठवलेला आहे. याचा अभ्यास करून कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याचा शोध लावण्यासाठी फायदा नक्कीच होणार आहे. आज किंवा उद्या कदाचित माहिती कळणार नाही आपल्याला काही दिवसांची वाट पहावी लागेल असेही परांजपे म्हणाले.


काही लोकांना वाटत असेल की ही मोहीम अयशस्वी झाली तर असं नाही म्हणता येणार अयशस्वी झाले शेवटच्या टप्प्यामध्ये आपण उतरू शकलो नाही. काही लोक असही म्हणतील तुमचे ध्येय होते चंद्रावरती उतरायचं. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मात्र याला आपण अपयश मानले नाही पाहिजे. आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून नक्कीच इस्रो यशस्वी होईल. अजूनही संपर्क होऊ शकतो का नाही ते मला आत्ता सांगणे शक्य होणार नाही. कदाचित होऊ शकेल कदाचित नाही हे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बसलेले सांगू शकतील. ते रेडीओच्या माध्यमातून संपर्क साधायचा प्रयत्न करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details