मुंबई -राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.
हेही वाचा -शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे दहशतवादी - कंगना
दरम्यान, २३ नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तर, आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोनासंबंधित सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन या शाळा आणि त्यातील वर्ग उघडले जाणार आहेत.