महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Schools Closed : मोठा निर्णय.. राज्यात 'या' दोन शहरातील शाळा बंद.. पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण सुरु

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला ( Covid Spread In Maharashtra ) असून, या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा शाळा बंद ( Maharashtra Schools Closed ) होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा बंद ( Navi Mumbai Panvel Schools Closed ) ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील शाळा बंद
शहरातील शाळा बंद

By

Published : Jan 4, 2022, 5:49 PM IST

Updated : Jan 4, 2022, 6:46 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ( Covid Spread In Maharashtra ) इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले ( Navi Mumbai Panvel Schools Closed ) आहेत. असे असले तरी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण मात्र सुरु राहणार आहे. कोरोनामुळे राज्यातही काही भागात ( Covid Spread In Maharashtra ) आधीच शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

दहावी व बारावीचे वर्ग वगळता इतर वर्ग बंद

मुंबई, पाठोपाठ नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता सर्व माध्यमाच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश या दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण नियमितपणे सुरू ( Online Learning Maharashtra ) राहणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता घेतला निर्णय

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी व नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मनपा क्षेत्रातील शाळा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 1ली ते 9 व 11वी चे वर्ग सुरू असलेल्या शाळा 30 जानेवारी पर्यत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यासह नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग यापुर्वी दिलेल्या निर्देशानुसार सुरू राहणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.

कोविड लसीकरण सुरु

दरम्यान, कोविड नियमांचे पालन करून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी ( Children Vaccination In Maharashtra ) बोलावण्यात येणार असून, हे लसीकरण पूर्ण होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रामुख्याने लक्ष देण्याचे सुचित करण्यात आले आहेत.

Last Updated : Jan 4, 2022, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details