मुंबई -आज (सोमवारी) राज्यभरातील शाळा सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. "माझी शाळा माझी जबाबदारी" या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सर्व शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांशी आज दुपारी 12 वाजता संवाद साधणार आहेत.
कोरोनाचे नियम बंधनकारक -
जवळपास दीड वर्षानंतर मुंबईसह राज्यातील मुख्य शहरांमध्ये शाळा सुरू होणार आहेत. शहरातील महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मग खासगी शाळा असतील या सर्वांना कोरोनाचे नियम आणि अटी पाळून शाळा उघडण्यात बंधनकारक असणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार तसेच महानगरपालिकेकडून काही गाईडलाईन्स शाळेला देण्यात आले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन शाळांना करावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये राज्यामध्ये असलेली कोरोनाचे परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये होणारा आता सुधार, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संवाद साधतील.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेने पाच जण जखमी
तब्बल दीड वर्षांनंतर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२वी तर ग्रामीण भागातही इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याची शाळेची साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण आजचे काम पूर्ण करण्यात आली आहेत.