महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून कौतूक ! - कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून कौतूक
मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील (Office of the Minister of School Education) कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले (saving women's lives) त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दोघांचे कौतूक केले आहे.
![महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून कौतूक ! Minister praises staff](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14605824-39-14605824-1646140663324.jpg)
मुंबई:वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी डुबल आणि मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत सदर महिलेस तात्काळ उडी मारण्यापासून प्रवृत्त करत रोखले आणि अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोघांचे कौतूक केले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाही. काही कामासाठी विभागाचे पत्र असल्यास त्यांना प्रवेश दिला जाते. मात्र, काम न झाल्यास अनेक नागरिक नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न होत असतो.
गेल्या काही वर्षपासून मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत होती. आत्महत्येचा प्रयत्न रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या कार्यकाळात मंत्रालयामध्ये जाळी लावण्यात आली आहेत. तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, आज जाळी लावून सुद्धा नैराश्याग्रस्त नागरिक मंत्रालयाचा प्रवेशद्वारांवर आत्महत्या करण्याचे प्रयत्न करत असतात.