महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

kesarkar on Education Policy : नवीन पॉलिसीनुसार शिक्षण देण्यासाठी तयार राहा -  केसरकर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण पॉलिसी आणली आहे. पुढील वर्षीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मातृभाषेत विद्यार्थी चांगले शिक्षण आत्मसात करू शकतात. त्यामुळे शिक्षणाच्या नवीन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तयार राहा असे आवाहन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

school education minister deepak kesarkar
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

By

Published : Feb 11, 2023, 1:56 PM IST

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ५० आदर्श शिक्षकांना मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले, वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात पडला. यावेळी आमदार यामिनी जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, उपआयुक्त केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपसंचालक संदीप संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.


मातृभाषेत शिक्षण: देशात उच्च शिक्षण मातृभाषेत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मातृभाषेत ग्रहण केलेले शिक्षण हे अधिक प्रभावीपणे समजते. या अनुषंगाने पुढील वर्षी जून महिन्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार आहे. येत्या काळात वैद्यकीय शिक्षण, सनदी लेखापाल (सीए) यासारखे उच्च शिक्षणही मराठीत घेता येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्यासाठी तयार रहावे असे केसरकर म्हणाले. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाद्वारे विविध महत्वाकांक्षी योजना राबवून शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य करत आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही केसरकर यांनी दिली.



मुलांना पायावर उभे करा: आमदार यामिनी जाधव यांनी दिव्यांग, विकलांग, अपंग, मतिमंद मुलांना फिजिओ तसेच औषधे मिळतील अशी व्यवस्था उभी करून या विशेष मुलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक चांगला माणूस आणि उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक अत्यंत परिश्रम घेऊन करतात. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतः उत्तम शिक्षक होते. ते म्हणायचे Teachers should be the best minds शिक्षक जर उत्तम व्यक्ती असेल तरच तो उत्तम नागरिक घडवू शकतो, असे त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा: Threat to Sanjay Raut राऊतांना धमकीचा फोन म्हणाले तुमचाही शशिकांत वारिसे करू

ABOUT THE AUTHOR

...view details