महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी - दहीहंडी उत्सवानिमित्त शाळांना सुट्टी

ठाणे आणि मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी

By

Published : Aug 23, 2019, 11:46 PM IST

मुंबई - ठाणे आणि मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी
मुंबई, नवी मुंबई यासह ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही सुट्टी देण्यात आली आहे. वरिष्ठ महाविद्यालयांच्या संदर्भात मात्र कोणताही निर्णय उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटनंतर, शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी करून सर्व शिक्षण विभागांना सुट्टीची माहिती दिली. मुंबई आणि परिसरात साजरा होणारा दहीहंडी उत्सव हा मुंबईकरांसाठी अत्यंत उत्साहाचा आणि आकर्षणाचा उत्सव असतो. यामुळे या दहीहंडीच्या दिवशी मुंबई आणि परिसरातील अनेक शाळांना व्यवस्थापनाकडून सुट्ट्या दिल्या जातात. मात्र यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी देण्याचे जाहीर केल्यामुळे उद्या मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील शाळा अधिकृतरीत्या बंद राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details