महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरण रक्षण : बाईक चालवणे कमी करून तो चालवतोय 'ई-किक' सायकल - ई-किक सायकल मुंबई

लहानपणी एक पाय जमिनीवर ठेवून आणि त्या पायाला गती लावून आपण किक सायकल चालवली असेल. आज याच किक सायकलचे 'ई'रूप आले आहे. अभिषेक शिगवण नावाचा तरुण पर्यावरण बचावासाठी मुंबईच्या रस्त्यावर ही सायकल चालवत आहे.

अभिषेक शिगवण

By

Published : Aug 21, 2019, 7:01 PM IST

मुंबई - लहानपणी एक पाय जमिनीवर ठेवून आणि त्या पायाला गती लावून आपण किक सायकल चालवली असेल. आज याच किक सायकलचे 'ई'रूप आले आहे. अभिषेक शिगवण नावाचा तरुण पर्यावरण बचावासाठी मुंबईच्या रस्त्यावर ही सायकल चालवत आहे.

अभिषेक शिगवण

मुंबईत वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मुंबईतील अभिषेक शिगवण या तरुणाने एक नवा उपक्रम मुंबईकरांसमोर ठेवला आहे. सतत दुचाकी चालवणाऱ्या अभिषेकने एक पर्याय शोधला आहे. लंडनमध्ये राहत असताना त्याला ही कल्पना सुचली. मायदेशी परतताना त्याने इलेक्ट्रिक किक सायकल जाणीवपूर्वक विकत घेतली. आता तो दैनंदिन कामासाठी याचा वापर करत आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाहनांचे प्रचंड वाढते प्रमाण प्रदूषणास हातभार लावत आहे. म्हणूनच अभिषेकने बाईक चालवणे सोडून दिले आहे आणि इलेक्ट्रिक किक सायकलचा वापर सुरू केला आहे. याआधी अभिषेकची ओळख बायकर म्हणून होती. पर्यावरण रक्षणाचे महत्व पटल्यानंतर त्याने इलेक्ट्रिक सायकलचा पर्याय निवडला.

अभिषेकचे शिक्षण हॉस्पिटीलिटी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले आहे. लंडनमध्ये कामानिमित्त गेल्यानंतर तेथील लोक छोट्या कामासाठीही इलेक्ट्रिक स्कुटीचा वापर करत असल्याचे दिसले. यामुळे प्रदूषणात घट होते आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते, हे त्याला समजले. अभिषेक भारतात परतला, तेव्हा इलेक्ट्रिक किक सायकल देखील घेऊन आला आणि त्याच्याजवळ असलेली बुलेट चालवणे बंद केले. या सायकलसोबत तो 'पर्यावरण वाचवा' असा संदेश सर्वांना देऊ लागला आहे.

"लहानपणापासूनच सायकलची आवड होती. मोठा झाल्यावर बाईक चालवण्याची सवय झाली. ती इतकी होती की, छोट्या-छोट्या कामासाठीही बाईक चालवू लागलो. लंडनमध्ये वास्तव्यास असताना पर्यावरणाचे महत्व समजले. मुंबईची सध्याची स्थिती पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाने आपल्या शहराला ग्रासले आहे. मी ठरवले की, भारतात परत येईन तेव्हा बाईक चालवणे पूर्णपणे कमी करेन आणि किक इलेक्ट्रिक सायकलचा वापर करेन. ही सायकल पंचवीस ते तीस किलोमीटर एका चार्जिंगवर चालते. तसेच फोल्डिंग असल्यामुळे ठेवण्याची अडचण नाही. मुंबईकरांना सांगेन की, या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा," असे अभिषेकने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details